Archived AartiShivaji Vyavam Shala
गणेश चतुर्थी - पाचव्या दिवसाची आरती
Text Size:
Aarti 1 of 2Ganesh
सुखकर्ता दुःखहर्ता
Sukhkarta Dukhharta
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।। सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।। कंठी झळके माळ मुक्ता फळांची ।। १ ।।
जय देव जय देव जय मंगलमुर्ती ।। दर्शन मात्रे मनःकामना पुरती ।। धृ ।।
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।। चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।। हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।। रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ।। जय ।। २ ।।
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।। सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।। दास रामाचा वाट पाहे सदना ।। संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना ।। जय देव जय देव जय मंगलमुर्ती ।। दर्शनमात्रे मनःकामना पुरती ।। ३ ।।
Bhavaarth / Meaning:Composed by Samarth Ramdas Swami in the 17th century, this beloved Ganesh Aarti praises Lord Ganesha as the creator of happiness, the destroyer of sorrow, and the remover of all obstacles.
Coming Up Next:
Aarti 2 of 2घालीन लोटांगण वंदीन चरण
