Ganpati Bappa
Aarti.site
Hymn 1 of 1Aarti
सुखकर्ता दुःखहर्ता
Sukhkarta Dukhharta
पवित्र आरती बोल (Devanagari Sacred Verses)
Text size
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।।
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।।
कंठी झळके माळ मुक्ता फळांची ।। १ ।।
जय देव जय देव जय मंगलमुर्ती ।।
दर्शन मात्रे मनःकामना पुरती ।। धृ ।।
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।।
रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ।। जय ।। २ ।।
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।
दास रामाचा वाट पाहे सदना ।।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना ।।
जय देव जय देव जय मंगलमुर्ती ।।
दर्शनमात्रे मनःकामना पुरती ।। ३ ।।
