शिर्डी माझे पंढरपूर
Shirdi Mazhe Pandharpur
शिर्डी माझे पंढरपुर ।
Aarti Saibaba (Saukhyadaataar Jiva)
Also known as: साईबाबांची आरती, Saibaba Aarti, Aarti Sai Baba Saukhyadataar Jiva, Shirdi Kakad Aarti
Source: सानपाड्याचा इच्छापूर्ती आरती संग्रह (पान ०८)
आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा ।
चरणरजातली । द्यावा दासा विसावा,
भक्ता विसावा ।। आ ।। ।। धृ ।।
जाळुनियां अनंग। स्वस्वरुपी रहेदंग ।
मुमुक्षूजनां दावी । निज डोळा श्रीरंग ।। आ ।। ।। १ ।।
जयामनी जैसा भाव । तया तैसा अनुभव
दाविसी दयाघना । ऐसी तुझीही माव ।। आ ।। ।। २ ।।
तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा ।
अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा ।। आ ।। ।। ३ ।।
कलियुगी अवतार । सगुण परब्रह्मः साचार ।
अवतीर्ण झालासे । स्वामी दत्त दिगंबर ।। द ।। ।। आ ।। ।। ४ ।।
आठा दिवसा गुरुवारी । भक्त करिती वारी ।
प्रभुपद पहावया । भवभय निवारी ।। आ ।। ।। ५ ।।
माझा निजद्रव्यठेवा । तव चरणरज सेवा ।
मागणे हेचि आता । तुम्हा देवाधिदेवा ।। आ ।। ।। ६ ।।
इच्छित दिन चातक। निर्मल तोय निजसुख ।
पाजावे माधवा या । सांभाळ आपली भाक ।। आ ।। ।। ७ ।।
Read with purity of heart and devotion 🙏
More Sai Baba Aartis →