या देवी सर्वभूतेषु
Ya Devi Sarvabhuteshu
या देवी सर्वभूतेषु माँ दुर्गा रूपेण संस्थिता ।
Durge Durgat Bhari
Also known as: श्री देवीची आरती, Devichi Aarti, Jai Devi Mahishasuramardini, Durga Aarti
Source: सानपाड्याचा इच्छापूर्ती आरती संग्रह (पान ०४)
दुर्गे दुर्घट भारी तुजविणं संसारी ।।
अनाथनाथे अंबेकरुणा विस्तारी ।।
वारी वारी जन्म मरणांते वारी ।।
हरी पडलों आतां संकट निवारी ।। १ ।।
जय देवी जय देवी महिषासुरमथिती ।।
सुरवरईश्वरवरदे तारक संजिवनी ।। धृ ।।
त्रिभुवन भुवनी पाहतां तुज ऐसी नाहीं ।।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही ।।
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।।
ते तुं भक्तांलागी पावसी लवलाहीं ।।
जय देवी जय देवी महिषासुरमथिती ।। २ ।।
प्रसन्नवदनें प्रसन्न होसी निजदासां ।।
क्लेशांपासुनि सोडवि तोडी भवपाशां ।।
अंबे तुजवांचुन कोण पुरविल आशा ।।
नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ।।
जय देवी जय देवी महिषासुरमथिती ।। ३ ।।
Read with purity of heart and devotion 🙏
More Durga Aartis →