शिर्डी माझे पंढरपूर
Shirdi Mazhe Pandharpur
शिर्डी माझे पंढरपुर ।
Tu Yer Ba Sai Baba
Source: सानपाड्याचा इच्छापूर्ती - आरती संग्रह
तू येर बा साईबाबा, तू येर बा साईबाबा ।
ओव्या गाऊ कौतुके तु येर बा साईबाबा ॥ धृ ॥
विठ्ठलाला तुळस गणपतीला दुर्वा ।
अन शंकराच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा ॥ १ ॥
आईबाबाला तहान लागली बाळ गेलं पाण्याला ।
अन दशरथाने बाण मारला श्रावण बाळाला ॥ २ ॥
चंद्रभागेच्या पूर आला पाणी लागले वडाला ।
अन रुक्मिणी म्हणे धाव विठ्ठला पुंडलिक माझा बुडाला ॥ ३ ॥
प्रभुरामाचा शिष्य तू अंजलीच्या सुता ।
हनुमंता उघड छाती दाखव रामसीता ॥ ४ ॥
वृदावनीं कृष्णाली वाजवली बासरी ।
अन कृष्णाला पाहुनी बाया राधा झाली बावरी ॥ ५ ॥
नावितो भस्म अंगाला शिवशंभो हा भोळा ।
अन नाग त्याने बैसविला गळा घालुनी वेटोळा ॥ ६ ॥
शकुनीच्या कपताने पांडवसारा हरीवला ।
अन द्रवपती म्हणते धावतु कृष्णा पदर माझा ओडीला ॥ ७ ॥
भक्ती त्याची पाहूनी गेला साई धावुनी ।
अन पाई आणल चालुनीया साई सेवक वाल्यानी ॥ ८ ॥
Read with purity of heart and devotion 🙏
More Sai Baba Bhajans →